महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले कौतुक

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील बूथ केंद्रांना दिली भेट

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ मे २०२४: पुणे लोकसभेसाठी आज मतदान सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे शहरातील कसबा, खडक येथील बूथ केंद्रांना भेट दिली.तेथील मतदानाबाबत माहिती घेतली.महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.या भेटीमुळे महायुती मधील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

यावेळी त्यांच्यासोबत पुणे शहर शिवसेनेचे सुधीर कुरूमकर, सुधीर जोशी, युवराज शिंगाडे, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, कांताताई पांढरे, सुरेखा पाटील,अनिता पवार,सविता राणवडे,रेणुका रोकडे,भाजपच्या खडक बूथ केंद्राच्या कल्याणी नाईक यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कसबा गणपती आणि शंकरबाबा महाराजांचे घेतले दर्शन

लोकसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळू देत आणि केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येऊ देत आणि जनतेचा आणखीन विकास व्हावा यासाठी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली,धनकवडी येथील शंकरबाबा महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *