मंगळवेढ्यात भरधाव मोटारसायकलची पाच वर्षीय चिमुकल्याला धडक: चालक फरार,गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात भरधाव मोटारसायकलची पाच वर्षीय चिमुकल्याला धडक: चालक फरार,गुन्हा दाखल mangalwedha crime

हाजापुरात शाळेला जाणाऱ्या पाच वर्षांच्या रणविरला मोटारसायकलची धडक : गंभीर दुखापत आरोपी चालकावर गुन्हा

मंगळवेढा तालुक्यातील हाजापुर येथे भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या मोटारसायकलने पाच वर्षीय मुलाला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. अपघातानंतर उपचार न करता पसार झालेल्या चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mangalwedha crime news :मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज– मंगळवेढा तालुक्यातील हाजापुर hajapur accident येथे भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या मोटारसायकलने पाच वर्षीय चिमुकल्याला पाठीमागून धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 12/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चरणसिंग गोपीसिंग रजपुत वय 30, व्यवसाय – शेती,रा.हाजापुर,ता. मंगळवेढा,जि.सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,दि.17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची मुलगी जानवी व मुलगा रणविर चरणसिंग रजपुत वय 5 वर्षे हे शाळेसाठी निघाले असताना घराच्या पाठीमागील हाजापुर जाणाऱ्या रस्त्यावर आले होते.

यावेळी आरोपी गणेश युवराज गळवे रा. हाजापुर,ता. मंगळवेढा याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH13-AH-5141 ही भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रणविर याला पाठीमागून धडक दिली.या अपघातात रणविर गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर आरोपी चालकाने जखमी बालकास उपचारासाठी न नेता तसेच अपघाताची कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून पलायन केले,असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध BNS कलम 281,125(A),125(B) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/212 ताटे करीत आहेत.

Leave a Reply

Back To Top