[ad_1]

मंगळवारी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. देशमुख कुटुंबाला भेटल्यानंतर, सुप्रिया सुळे यांनी स्वतः लढाई लढण्याची शपथ घेतली.
परळी जिल्हा: बीड येथील स्व महादेव मुंडे यांचा १६ महिन्यांपूर्वी खून झाला होता. त्यांच्या मारेकऱ्यांना अद्यापही शोधण्यात पोलीस यशस्वी झाले नाहीत. बीडच्या दौऱ्यावर असताना मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. स्व. महादेव मुंडे यांच्या… pic.twitter.com/5MTGZnW3DA
— Supriya Sule (@supriya_sule) February 18, 2025
https://platform.twitter.com/widgets.jsमिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी त्यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. देशमुख कुटुंबाला भेटल्यानंतर, सुप्रिया सुळे यांनी स्वतः लढाई लढण्याची शपथ घेतली आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी बीडमधील नागरिकांना सांगितले की, यापुढे बीडमध्ये कोणावर हल्ला झाला तर त्यांनी मला फोन करावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २ महिने उलटूनही एक आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यातून फरार आहे.
देशमुख कुटुंबीयांनी केली सुरक्षेची मागणी
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर संतोष देशमुख यांच्या आईसह संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले. देशमुख कुटुंबीयांनी खासदार सुळे यांच्याकडे न्याय आणि सुरक्षेची मागणी केली. यावेळी सुप्रिया म्हणाल्या की, आपले मूल गमावणे हे आईसाठी सर्वात मोठे दुःख असते. त्यांनी सांगितले की हा राजकीय मुद्दा नाही. माणूस म्हणून आपण या प्रकरणात न्याय मिळवून दिला पाहिजे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुलीला वाईट स्पर्श समजतो…मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील बडतर्फ लेफ्टनंट कर्नलची शिक्षा कायम ठेवली
[ad_2]
Source link

