शाळकरी मुलांची तहान भागवून वाढदिवस साजरा..
खर्डी प्राथमिक शाळेला आरो प्लांट भेट
खर्डी परिसरातील प्राथमिक शाळेला स्पीकर संच,एल ई डी प्रोजेक्टर,पंखे अशी उपयोगी उपकरणे दिली

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज /अमोल कुलकर्णी- उद्योजक आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात पण वाढदिवस उपक्रम काय घेऊ असे विचारून ठोस भरीव कार्य समाजासाठी करणारा लाखात एक असतो.असेच उदाहरण म्हणजे तरुण उद्योजक सुयोग गायकवाड.खर्डी येथील श्री सीताराम महाराज कारखान्याचे संचालक सुयोग गायकवाड. राजलक्ष्मी गायकवाड यांचे सुपुत्र यांनी आपला वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला.

खर्डी परिसरातील प्राथमिक शाळेत स्पीकर संच,एल ई डी प्रोजेक्टर,पंखे अशी उपयोगी उपकरणे देऊन मुख्य केंद्र शाळेत आरो प्लांट बसवून दिला.त्यामुळे मुलांच्या पाठीवरील पाण्याच्या बाटलीचे ओझे तर कमी झालेच शिवाय भर उन्हाळ्यात मुलांना आता त्यांची तहान शुद्ध पाण्याने भागणार आहे.

हा उपक्रम राबविताना सुयोग फाउंडेशन चे ओंकार घोडके, सागर मासाळ,रणजीत ताड,राकेश जाधव,लखन सोलंकी, अविनाश काळूंगे,श्रीकांत रोंगे,सचिन चव्हाण,असलम पठाण, प्रथमेश घाडगे,मच्छिंद्र वाघमोडे उपस्थित होते.

यावेळी प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छेचा कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार केला.या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत असून असे विधायक उपक्रम राबवून नवोदित नेत्यांनी एक आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.


