आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवाची विधीवत पूजा संपन्न

आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देवाची विधीवत पूजा संपन्न

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील प्राचीन सूर्यनारायण देवाच्या यात्रेनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा संपन्न,हजारो भाविकांची उपस्थिती.

Narayanchincholi news : पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवाची suryanarayan dev yatra वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात सुरू असून ही यात्रा पौष महिन्यात संपूर्ण महिनाभर चालते. या कालावधीत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी नारायण चिंचोली येथे दाखल होत आहेत.

नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देवाचे मंदिर अत्यंत प्राचीन असून संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर महाराष्ट्रातील दुर्मिळ आणि एकमेव हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील मंदिर म्हणून ओळखले जाते.त्यामुळे या यात्रेला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.

या पवित्र यात्रा काळात आज माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत धनंजय पाटील abhijeet patil यांनी नारायण चिंचोली येथे भेट देत सूर्यनारायण देवाची विधीवत पाद्य पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

या पूजाविधीच्या प्रसंगी ग्रामस्थांसह आमदार अभिजीत पाटील यांचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अतुल चव्हाण,विठ्ठल रणदिवे, तानाजी सालविठ्ठल,लक्ष्मण कोले, अभिजीत कवडे,नवनाथ कोले,महेश गुंड,धनाजी पासले,बाबासो मुलानी, उमेश दाढे,अनुप मोरे,दिगंबर शिंदे,रवींद्र ठवरे, शिवाजी सलगर आदी मान्यवरांसह विठ्ठल परिवार व रयतेचा राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देवाच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.यामध्ये पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ. प्रणितीताई भगीरथ भालके,पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन वसंत देशमुख,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके,भाजप तालुकाध्यक्ष सुभाष मस्के,पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, शिवसेना (शिंदे गट) ग्राहक संरक्षण तक्रार निवारण विभागाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन काळे,ए.पी.आय. शहाजी गोसावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Back To Top