मालवाहतूक करणार्या ट्रकला पिकअपने दिली धडक
पिकअप चालकाविरुध्द गुन्हा दाखल…
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा ते उमदी मार्गावर मालट्रकला पिकअपने भरधाव वेगात येवून जोराची धडक दिल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या प्रकरणी पिकअप चालक अविनाश खेमू राठोड रा.हगलूर जि.विजयपूर याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दि.6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता फिर्यादी बिरा उर्फ बलबीर सौदागर रा.चिकोडी जि.बेळगाव हे बारा टायर मालवाहतूक ट्रक क्रमांक एम.एच.42 वाय 6761 हा कर्नाटक येथून तांदूळ घेवून मुंबई येथे खाली करण्यास घेवून जात असताना रात्री 12.15 वाजता मरवडे शिवारातून उमदीकडे जाणार्या रस्त्यावर समोरुन येणार्या महिंद्रा कंपनीचा माल वाहतूक पिकअप के.ए.28 ए.बी.3075 वरील आरोपी चालकाने भरधाव वेगात येवून ट्रकचे डावे बाजूस जोराची धडक देवून ट्रकचे नुकसानीस व स्वत: जखमी होण्यास कारणीभूत ठरला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

