छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी

[ad_1]

accident
Chhatrapati Sambhajinagar News: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पहाटे एक भरधाव ट्रक उलटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला आणि १३ जण गंभीर जखमी झाले.

ALSO READ: गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी 'अंधश्रद्धेतून बाहेर पडून मेंदूचा योग्य वापर करण्याचे' आवाहन केले

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. पहाटे एक ट्रक वेगाने जात होता, तो अचानक उलटला. ट्रक उलटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले. पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पिशोर घाट परिसरात घडली. ऊसाने भरलेला ट्रक कन्नडहून पिशोरकडे जात असताना ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, ट्रकमध्ये एकूण १७ कामगार प्रवास करत होते आणि पिशोर घाटातून जात असताना, चालकाचे  ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर गाडी उलटली. व कामगार रस्त्यावर पडले आणि उसाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांनी सांगितले की नंतर चार कामगारांचा मृत्यू झाला तर १३ जणांना जिवंत वाचवण्यात आले. जखमी कामगारांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अशी माहीत समोर आली आहे.

ALSO READ: काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: बीड : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सतीश भोसले यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मिळाली धमकी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top