स्टार प्रचारक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उत्तर भारत दौऱ्यावर रवाना

स्टार प्रचारक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उत्तर भारत दौऱ्यावर रवाना


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


स्टार प्रचारक म्हणुन एन डी ए उमेदवारांचा करणार प्रचार

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)साठी उत्तर भारत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.मुंबईतुन त्यांनी दिल्लीला प्रयाण केले.दिल्ली येथून हरियाणाच्या सोनीपथ,कर्नाल आणि अंबाला लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांचा प्रचार ना. रामदास आठवले करणार आहेत.

कर्नाल येथे भाजपचे हरियाणा चे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर लोकसभा निवडणुक लढत आहेत.त्यांच्या प्रचारासाठी ना.रामदास आठवले कर्नाल येथे प्रचार करणार आहेत.

दि.22 मे रोजी ना.रामदास आठवले उत्तर प्रदेशमधील विविध लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दि.22 रोजी जौनपुर येथे भाजप उमेदवार कृपाशंकर सिंग यांच्या प्रचारासाठी ना. रामदास आठवले जौनपुर येथे रोड शो आणि जाहिर सभांना संबोधित करणार आहेत. दि.22 आणि 23 मे रोजी ना.रामदास आठवले जौनपुर, वाराणसी, सारनाथ या ठिकाणी ते भेटी देणार आहेत.वाराणसी लोकसभा मतदार संघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणुक लढत आहेत.

दि.25 मे रोजी ना.रामदास आठवले पंजाब राज्यात भाजप एनडीए उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

दि.27 मे रोजी ना.रामदास आठवले हे अभिनेत्री कंगणा राणावत या भाजप तर्फे निवडणुक लढत असलेल्या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघात प्रचार सभांना संबोधित करणार आहेत.

दि.23 मे रोजी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्द यांची 2586 वी जयंती बुध्द पौर्णिमा सारनाथ येथील प्राचीन धम्मेक स्तुप येथे साजरी करण्यात येणार आहे.बुध्द जयंतीचा मंगल उत्सव सारनाथ येथे ना. रामदास आठवले साजरा करणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading