पंढरपुरातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आचारसंहिता संपताच होणार बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले लक्ष- राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- देशभरात सरकार च्यावतीने लाखो बेघरांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे.सदर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पंढरपूर शहरात देखील घरे बांधण्यात आली आहेत.मात्र हा प्रकल्प अपुऱ्या अवस्थेत आहे तरी याबाबत संबंधित अधिकारी व सचिव यांची उपमुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करून यातुन योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
त्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे अधिकारी व इतर संबंधितांची लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपताच बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रश्नात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्य घातल्यामुळे या प्रकल्पातील लाभार्थ्यांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
निवेदनात असे म्हटले आहे की, देशभरातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दि 19 जानेवारी 2024 रोजी लोकार्पण सोहळा पार पडला. तेथील घरांच्या व पंढरपूर येथील घरांच्या किंमतीमध्ये खुप मोठ्या प्रमाणात तफावत आहे.त्यामुळे पंढरपूर येथील आवास योजनेसाठी ज्या लोकांनी पैसे भरले त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी घरे न घेता पैसे परत घेतले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील घराची किंमत अंदाजे 3 लाख 71 हजार तर पंढरपूर येथील घराची किंमत ही 5 लाख 75 हजार इतकी आहे.तसेच त्यावर प्रचलित दराने बॅंकेचे व्याज आकारणी केल्यास सदर घरांची किंमत आणखीन जास्त होत आहे. सोलापूरच्या धर्तीवर पंढरपूर येथील आवास योजनेचे मुल्यनिर्धारण करून बेघरांना घरे दिल्यास सध्या बंद अवस्थेत असलेली योजना पूर्ण होवून अनेक बेघर असणाऱ्यांना घरे मिळतील.शासनाचा प्रकल्प पुर्ण होईल.
यापूर्वी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाठपुरावा करत जादा आकारण्यात येत असलेल्या रक्कमेचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांना कमी किंमतीत घर मिळावे यासाठी सदरच्या प्रकल्पावर स्टे आणलेला होता नंतर तो उठविण्यात आला.परंतू अनेक सर्वसामान्य नागरिकांनी घर घेण्यासाठी बॅंक व इतर संस्थांकडून कर्ज घेवून त्याची रक्कम भरलेली आहे त्यांना हप्ते चालू आहेत मात्र अद्यापही घराचा ताबा मिळालेला नाही. याबाबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश देवून देखील त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.पंढरपूर नगरपरिषदेचे दोन अधिकारी बदलले मात्र सदरची योजना पुर्ण झाली नाही.नागरिकांना घराचा ताबा मिळाला नाही.आता प्रशासक तथा प्रांताधिकारी व मुख्यमंत्री यांनी सदरचे योजनेविषयी गांभीर्याने लक्ष देवून नागरिकांना लवकरात लवकर घराचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीकांत शिंदे केले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.