वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता ते एक दिवसाचा बंद पाळणार
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता संघटना ही वृत्तपत्र विक्रेत्याच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता जिल्ह्यातील वृत्तपत्र प्रशासनातील अधिकारीक व्यक्तींशी पत्रव्यवहार करत आहे परंतु त्याची म्हणावी तशी दखल वृत्तपत्र प्रशासनाने घेतली नाही.
यात प्रमुख मागणी अशी आहे – आधारभूत किंमत सात रुपये ठेवून त्यावर दोन रुपये दहा पैसे कमिशन मिळावे.हे कमिशन शहरी वृत्तपत्र विक्रेता व ग्रामीण वृत्तपत्र विक्रेता असा कोणताही भेदभाव न करता सरसकट कमिशन मिळावे या मागण्याचे निवेदन जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी वृत्तपत्र प्रशासनाला लेखी निवेदने दिले असून याची दखल न घेतल्यास येत्या पाडव्याच्या दिवशी दि. 30 मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते एक दिवसाचा बंद पाळणार आहेत तशी लेखी निवेदनात नमूद करण्यात आले असल्याचे वृत्तपत्र विक्रेता संघटनाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगप्पा मेढेकर, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,राज्य सदस्य गोरख भिलारे, शहर संघटक महेश पटवर्धन, जिल्हा सदस्य सावंत यांनी दिली.

वरचेवर वाढणारी महागाई यामुळे वृत्तपत्र विक्रेता अडचणीत आला असून आपल्या कमिशनमध्ये अल्पशिका होईना वाढ करावी याकरता गेले अनेक दिवसांपासून जिल्हा वृत्तपत्र प्रशासनातील संबंधितांना लेखी निवेदने देऊनही त्यांच्याकडून अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय न आल्याने रविवारी पंढरपूर येथील शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीत चर्चा होऊन जर वृत्तपत्र प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते हे जिल्ह्या तील वृत्तपत्र विक्री बंद ठेवून गुढीपाडव्या दिवशी काळी गुढी साजरी करतील.त्यामुळे वृत्तपत्र प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्याने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी वृत्तपत्र संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. वृत्तपत्र विक्रेता एजंट यांचे कडून अंकापोटी जे डिपॉझिट घेतले जाते ते डिपॉझिट बिनव्याजी असून त्यावर किमान बँक रेट प्रमाणे तरी एजंटना व्याज मिळावे. जाहिरात पुरस्कृत पुरवणीचे एक रुपया प्रमाणे चार्जेस मिळावेत. वर्षाखेरीस वृत्तपत्रात दिनदर्शिका दिली जाते त्या दिनदर्शिकेचे हाताळणी चार्जेस सर्व एजंट व विक्रेते बंधूंना तीन रुपये प्रमाणे मिळावेत शिवाय विजयादशमीला सुट्टी जाहीर करावी आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.