महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या प्रवक्ते पदी महेंद्र गणपुले

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या प्रवक्तेपदी महेंद्र गणपुले Mahendra Ganapule as spokes person of Maharashtra State Headmasters Corporation
 वडगाव कांदळी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. यामध्ये महेंद्र गणपुले यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदी बिनविरोध नियुक्ती झाली.महेंद्र गणपुले हे गुरुवर्य देव प्रशाला बोरी खुर्द (ता.जुन्नर) या माध्यमिक  शाळेचे मुख्याध्यापक आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या  सांभाळली आहे. महेंद्र गणपुले यांची राज्याच्या प्रवक्तेपदी निवड झाल्या मुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

महेंद्र गणपुले हे पंढरपूर जि.सोलापूरचे सुपुत्र असून एकपात्री कलाकार म्हणूनही देशभरात ओळखले जातात. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: