पंंढरपूर उपनगरवासीय नागरी सुविधांपासून वंचितच – यशवंत डोंबाळी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरमध्ये अनेक नागरी वस्ती असलेली उपनगरे आहेत परंतु नगरपालिकेच्या नागरी सुविधा तिथपर्यंत पोहोचत नाहीत.उपनगरांमध्ये नगरपालिकेच्या अनेक मोकळ्या जागांवर तसेच रस्त्याच्या कडेला झाडीझुडपे वाढली असून डासांचे प्रमाण वाढले आहे .आरोग्य खात्याने अजून एकदाही फवारणी केलेली नाहीत किंवा झाडीझुडपे काढलेली नाहीत. नागरिक खुल्या जागेत केरकचरा टाकतात. अनेकवेळा प्राणी मरून पडलेले असतात त्यांची दुर्गंधी सुटलेली असते .

उपनगरांमध्ये गुराखी रस्त्यावरून म्हशींचे कळप ने आण करत असतात त्यामुळे रस्ते शेणाने घाण होत असतात. नगरपालिकेकडे लेखी,तोंडी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.तसेच दुर्लक्षित उपनगरांमध्ये आठवड्यातून एकदाच रस्ते स्वच्छ केले जातात.काही माजी नगरसेवकांच्या वाॕर्डात मात्र नियमीत स्वच्छता केली जाते.घंटागाड्याचींही हीच परिस्थिती आहे काहीवेळा खूप उशीरा येतात.
पंंढरपूर उपनगरवासिय नियमीत करदाते असूनही नगर पालिका प्रशासन नागरिकांना मूलभुत सुविधा देत नाही अशी खंत सामाजिक कार्यकर्ते यशवंत डोंबाळी यांनी व्यक्त केली.उपनगरवासियांना मुलभूत सुविधा नगरपालिकेने द्याव्यात अन्यथा न्यायासाठी मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली जाईल असेही त्यांनी सांगितले.

अनेकवेळा घंटागाडी उशिरा येते किंवा येतही नाही त्यामुळे घरकामगार वर्गाच्या वेळेपेक्षा इतर वेळी घंटागाडी आली तर कचरा उघड्यावर टाकला जातो त्यासाठी पूर्वीप्रमाणे कचराकुंड ठेवले तर इतरत्र कोठेही कचरा उघड्यावर टाकला जाणार नाही.याबाबत नगरवासियांची मागणी आहे त्याचा विचार प्राधान्याने करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे केली जात आहे.