न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95%

न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95%


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2024 इयत्ता दहावी या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल ,भाळवणी तालुका पंढरपूर या विद्यालयाचा निकाल 97.95 % लागला आहे .या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून 244 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्या पैकी 239 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यावेळी विशेष प्रावीण्य -98 विद्यार्थी प्रथम श्रेणी -68 विद्यार्थी
द्वितीय श्रेणी -52 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी – 21 मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

या विद्यालयातून प्रथम क्रमांक पासले प्रतीक्षा देविदास- 96.20% ,द्वितीय क्रमांक- झांबरे प्रणाली संजय -96.00%, तृतीय क्रमांक निराळी शांभवी नागनाथ -94.60% गुण मिळवून यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी शिंदे, प्राचार्य गायकवाड एन.एम., पर्यवेक्षक श्री रोकडे व मार्गदर्शक विषय शिक्षक तसेच सरपंच रणजित जाधव , उपसरपंच नितीन शिंदे तसेच सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading