श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं नूतनीकरण,अनावरण आणि शेतकरी मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न
बारामती /प्रतिनिधी- बारामतीतील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड याठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं नूतनीकरण, अनावरण समारंभ आणि शेतकरी मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जी शिकवण दिली, त्याच शिकवणीतून आपण सगळे पुढे जात आहोत.छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज ही सर्व महान विभूती आपली दैवतं आहेत. या महान विभूतींची जिथं कुठं स्मारकं असतील, पुतळे असतील त्यांची देखभाल करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.याप्रमाणे दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामार्फत वेळीच महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं ही समाधानाची बाब आहे.
महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे साखर कारखान्याच्या परिसराची शोभा वाढली आहे, याचा आनंद माझ्यासह माळेगाव साखर कारखान्याचे अधिकारी-पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांना देखील आहे. शेतकऱ्यांना ऊस दर राज्यात सर्वाधिक देणारा कारखाना म्हणून माळेगाव साखर कारखान्याची ओळख आहे, ती ओळख यापुढेही आपल्याला कायम ठेवायची आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून-मिसळून समन्वयानं, एकमेकांच्या सहकार्यानं कामं करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.