रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले – प्रणिती शिंदे

रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले – प्रणिती शिंदे


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंच्यावतीने २५ मूर्तीचे वाटप

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ मे २०२४ – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाकरिता २५ मूर्तीचे वाटप आमदार प्रणितीताई शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल,शिवसेना जिल्हा अध्यक्ष गणेश वानकर, मा.नगरसेवक सुरेश पाटील, विनोद भोसले, अशोक निंबर्गी, मनोज यलगुलवार, बाळासाहेब शेळके, संयोजक चेतन नरोटे,पृथ्वीराज नरोटे, मध्यवर्तीचे अध्यक्ष अमर हळली,सागर पिसे, जयवंत सलगर,माणिक नरोटे,अक्षय वाकसे, अशोक देवकते,महिलाध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे करण्यात आले. यावेळी मूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी आणलेल्या धनगरी गजी ढोल, ताश्या, हलग्याच्या आवाजाने, जय मल्हार च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चेतन नरोटे, पृथ्वीराज नरोटे यांनी मूर्ती वाटप कार्यक्रम घेतला तो अतिशय चांगला उपक्रम आहे, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घराघरात पोचले पाहिजे.अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ माँ साहेब, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांनी चौकटीबाहेर जाऊन समाजातील सगळ्यासांठी काम केले. पुरुषप्रधान समाजामध्ये अश्या महिलांनी आपल्या कार्यामुळे, लढल्यामुळे त्यांना आज मोठ्ठे स्थान प्राप्त झाले आहे. आम्ही त्यांचा संघर्षाची कहाणी ऐकल्यामुळे त्यांचा आदर्श घेतल्यामुळे आज तुमच्यासमोर उभा आहे. आपण जयंती साजरा करताना विसरू नये की आपल्याही घरात एक अहिल्या आहे तिला प्रोत्साहन द्या, सन्मान द्या, आपण सगळ्यांनी नेहमी मला, काँग्रेस पक्षाला साथ दिली, परवाच्या निवडणुकीत ही सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते, आज सर्वात जास्त त्रस्त शेतकरी आहेत, जिथे जिथे मी गेले त्यांचे दुःख जाणून घेतले, त्यांचे अश्रू पुसून टाकण्याची ताकद देवामध्ये आहे. त्यांनी आम्हाला समाजकार्य करण्याची जबाबदारी आम्हाला दिले आहे कालच वादळवाऱ्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना भेटून धीर दिला. शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची पिळवणूक करणारे, आरक्षणाचे गाजर दाखविणारे सत्ताधारी जाऊन लवकरच देशात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे सरकार येवो अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्रार्थना, त्यांच्याच आशीर्वादाने सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे प्रश्न रेटून मांडून सोडविण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पृथ्वीराज चेतन नरोटे यांना त्यांच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा देते आणि सर्वाँना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देते.

या कार्यक्रमास महादेव येरणाळ, रुपेश गायकवाड, संगप्पा म्याकल, महेश गाडेकर, विलास पाटील, आबा मेटकरी, मनीषा माने, गणपत कटरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तिकोंडा, हणमंतू सायबोळू, जितू वाडेकर, दत्ता शिरगिरे, आनंद जमदाडे, गणेश माने, राजू पुठ्ठा, भारत सलगर, दिनेश भिसे, राजू येरणाल, पांडुरंग पुठ्ठा, आप्पा सलगर, विलास खांडेकर, अतीन चौरे, विजू थोरात, संजय कदम, सन्नी देवकते, आदर्श पुठ्ठा, अक्षय टेळे, आदित्य पुठ्ठा, शृंगार मेटकरी, इंद्रजित नरोटे, नागेश म्हेत्रे, सागर उबाळे, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, संकेत माने,गणेश वड्डेपल्ली,सुभाष वाघमारे, संजय गायकवाड,सुशीलकुमार म्हेत्रे,महेश वड्डेपल्ली, शिवशंकर अंजनालकर, बापू वाघमोडे,मनिष मेटकरी,नूर अहमद नालवर, शोभा बोबे,सुमन जाधव,शिल्पा चांदणे, प्रियांका गुंडला,अभिषेक अच्युगटला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading