एम.एस.एस ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने बाजी मारली

बारावी विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश

चिंचवड – नुकत्याच झालेल्या इ. १२ वी इ. १० परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यंदा एम.एस.एस ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल लागला आहे.या वर्षीच्या बारावी परिक्षेत एम.एस.एस ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने बाजी मारली आहे. पुन्हा एकदा या महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी महाविद्यालयाने हे यश प्राप्त करून दाखवले आहे.पहिल्या वर्षाप्रमाणे दुसऱ्या वर्षीही महाविद्यालयाने आपल्या निकालात सातत्य राखत शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन लाभले त्यामुळे हे यश मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक श्रीमती शकुंतला माटे व प्राचार्या इंद्रायणी पिसोळकर यांनी अभिनंदन केले.

विज्ञान शाखेत
१) तनाया अग्रवाल (८७.६७ टक्के),
२) हेमंत जडार (८६.५० टक्के)
३) सानिका दुबळ (८५.१७ टक्के)

वाणिज्य शाखा
१) राशी पळुसकर (८१. ६७ टक्के)
२) समृद्धी गोडसे (७९.३३ टक्के)
३) तन्वी कुलकर्णी ( ७४.६७ टक्के)

कला शाखा
१) पौर्णिमा भूमकर (७१.१७ टक्के)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *