विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे : उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे ,स्वेरीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे – उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे; स्वेरीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ScienceExhibition भव्य उद्घाटन

पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ५३ व्या सोलापूर जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे ScienceExhibition उद्घाटन झाले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती करावी, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांनी केले.

ScienceExhibition SVERI pandharpurnews पंढरपूर |दि.५ जानेवारी २०२६ | ज्ञानप्रवाह न्यूज- विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे.विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचा उपयोग करून नवनिर्मिती केली पाहिजे. प्रकल्प कदाचित छोटा असेल पण त्यातून मोठा संदेश समाजाला मिळतो.विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर अशक्य असे काहीच नाही, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे यांनी केले.

राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपूर आणि शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक),जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर ता. पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) येथे आयोजित ५३ वी सोलापूर जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी २०२५-२६ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.यावेळी स्वेरीचे सचिव डॉ.सुरज रोंगे अध्यक्षस्थानी होते.

दि.५ व ६ जानेवारी २०२६ या दोन दिवशी होणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी विज्ञान व गणित प्रदर्शनाचे महत्त्व विशद करत अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागते,असे सांगितले.स्वेरीने केलेल्या नियोजनाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांनी अपुऱ्या साधनांमधूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून भविष्यात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, सुनिता विल्यम्स,कल्पना चावला यासारखे शास्त्रज्ञ घडतील,असा विश्वास व्यक्त केला.

उच्च माध्यमिक शिक्षण सहनिरीक्षक अनिल बनसोडे म्हणाले की, विज्ञान स्वीकारताना नैतिकता आवश्यक आहे. नैतिकतेच्या आधारावर विज्ञानाचा उपयोग सकारात्मक कार्यासाठी करता येतो कारण साध्या गोष्टींतच मोठ्या संकल्पना दडलेल्या असतात.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.सुरज रोंगे यांनी विद्यार्थ्यांना संयम, कष्ट व सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे असले तरी सहभाग घेणे अधिक महत्त्वाचे असून त्यातून जीवनाला योग्य दिशा मिळते,असे त्यांनी नमूद केले.

या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाचे विजेते प्रकल्प सादर करण्यात आले असून, यामधून तीन प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत जवळपास १२४ प्रकल्पांची नोंद झाली असून आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू चव्हाण, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ, नीलकंठ लिंगे,वरिष्ठ लिपिक मनोज साबळे,विश्वास नागणे, तसेच स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, प्रा.ए.एस.भातलवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लटके यांनी केले.आभार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय भस्मे यांनी मानले.

उद्या दि.६ जानेवारी रोजी प्रदर्शनाचा समारोप असून यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

sweri-solapur-district-level-science-exhibition-2026

Leave a Reply

Back To Top