दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा- चेअरमन कल्याणराव काळे/दादा साठे

सोलापूर जिल्हयातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे अनुदान तात्काळ जमा करावे – चेअरमन कल्याणराव काळे/दादा साठे

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५-सोलापूर जिल्ह्यातील दुध पुरवठा करणाऱ्या व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने जमा व्हावे अशी मागणी सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे, कुर्मदास सह.साखर कारखान्याचे चेअरमन दादा साठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली.

त्यावेळी तात्काळ निवेदनाची दखल घेत दुग्ध विकास आयुक्तांना दुरध्वनीवरुन संबंधीत विभागास प्रलंबित शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी महायुती सरकारने दूध उत्पादक शेकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५/- व ७/- रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.मागील काही महिन्यां पासून पावडर प्लांटचे अनुदान जमा झाले होते परंतु दुधाचे अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत तरी त्यांचे अनुदान जमा व्हावे असे या निवेदनात चेअरमन कल्याणराव काळे, कुर्मदास सह.साखर कारखान्याचे चेअरमन दादा साठे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्नासाठी कायम तत्पर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क करत दुध अनुदान लवकर जमा करण्याचे दुग्ध विकास आयुक्तांना सुचना दिल्याने दुध उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading