नागपूर येथे काटोल रोड वरील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयजवळ दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. रवींद्र शांताराम भोयर(50) असे या मयताचे नाव आहे. तर दत्तू नथू पडवे हे जखमी झाले आहे.
ALSO READ: नागपुरात रेस्टॉरंट मालकाची गोळ्या घालून हत्या
दत्तू यांचे त्रिमूर्ती नगर येथे सलून आहे. रविवारी दुपारी रवींद्रने दत्तुला गावातून गहू आणण्यासाठी सोबत नेले.तिथे ते भावाला भेटले नंतर रात्री 9:30 च्या सुमारास दोघे दुचाकीवरून परत येताना गोरेवाडा प्राणिसंग्रहालयासमोर उभा असलेल्या ट्रक मध्ये जाऊन धडकले.
ALSO READ: बुलढाण्यात भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू
या अपघातात रवींद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मागे बसलेले दत्तू देखील गंभीर जखमी झाले. जवळून जाणारे लोक त्यांच्या मदतीसाठी धावले. उपचाराधीन असता रवींद्र यांचा मृत्यू झाला. दत्तूच्या तक्रारीवरून ट्रक चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.