पंढरपूरातील खासगी हॉस्पिटलमध्ये होणारी रुग्णांची अवाजवी आकारणी थांबवावी व नियम अटी लागू करा -शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची मागणी….
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : नुकत्याच पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैसे नसल्याने एका गरोदर महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच राज्यातील विविध शहरांमधील खासगी रूग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना लुटले जात असल्याची तक्रार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर तालुकाप्रमुख बंडू घोडके व जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली आहे.पंढरपुरमध्ये कांही खासगी रूग्णालयांकडून लुट होत असल्याचा खळबळजनक आरोप पंढरपुरातील समाजसेवक तथा महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी नुकताच केला होता.

पंढरपूर शहरातील काही खासगी रूग्णालयात विविध उपचारासाठी अवाजवी रक्कम आकारली जाते.गरीब रूग्णांच्या फी संदर्भातील महात्मा फुले जन आरोग्य व इतर शासकीय योजनांमध्येसुद्धा घोटाळा असल्याचा संशय आहे तसेच धर्मादाय हॉस्पिटलमध्येही नीट काम चालतंय का नाही याचीही चौकशी झाली पाहीजे.याबाबत अनेक तक्रारी होऊन सुध्दा यावर कारवाई होत नाही तसेच उपचाराचे प्रकार व त्या संदर्भातील हॉस्पीटलची फी यासंदर्भाची माहिती असलेले फलक पंढरपूर शहरातील सर्वच खासगी हॉस्पिटलमध्ये लावण्याची सक्ती करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,तालुकाप्रमुख बंडू घोडके,जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनी उपविभागीय अधिकार्यांना दिले.

गॅस सिलिंडर दरवाढीचे निवेदन तहसीलदार सचिन लंगुटे पंढरपूर तहसील कार्यालय यांना देवून केंद्र सरकार ने केलेल्या सिलेंडर दरवाढी चा निषेध नोंदवला आणि केंद्र सरकार ने गॅस सिलेंडर दरवाढ मागे घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
तर पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देत बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशी साठी बाभुळगाव येथे उपोषणास बसलेले गावचे रहिवाशी व शिवसैनिक सुहास चव्हाण न्याय द्यावा तसेच सरकारी गट नं ३५४ मधून अवैध मुरूम उचलल्याबाबत, दलित वस्ती मधील कामे न करता शासनाकडून बिले घेतल्याबाबत ,बाभुळगाव ते तुंगत रस्ता न करता ३३ लाख रूपयाचे बिल उचलणे, खंडोबा मंदीराचे काम न करता बिले उचलणे, घंटागाडीच्या बिलांची व कामांची चौकशी करावी यासाठी ते अमरण उपोषण करीत आहेत.वरील सर्व मांगण्या संदर्भात स्पष्टीकरण देऊन त्वरीत चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,तालुकाप्रमुख बंडू घोडके,जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे,बाळासाहेब रणदिवे,भारत कदम, उपतालुकाप्रमुख नागेश रितुंड, संजय घोडके,विलास चव्हाण,बंडू कोरके,नामदेव चव्हाण,युवराज गोमेवाडीकर, अमोल पवार, अतिश खुळपे,बाळासाहेब देवकर,महेश मेहेर, संगिताताई पवार,सुनंदाताई गायकवाड, विमलताई टिंगरे, कल्याण कदम ,दत्तात्रय पाटील,पोपट इंगोले, प्रविण शिंदे, विलास माने,दत्ता शिंदे, किसन केंजळे आदींसह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
