पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वाळू चोरी विरोधी पुन्हा एकदा धडक मोहीम

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वाळू चोरी विरोधी पुन्हा एकदा धडक मोहीम Pandharpur taluka police station’s anti-sand theft campaign once again
   पंढरपूर,14/06/2021 - पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांनी सोलापूर ग्रामीण घटकातील अवैध धंद्यावर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे व पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस  निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे

दि 13/06/2021 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि खरात यांनी गुप्त माहिती काढून सदर माहितीप्रमाणे सरकोलीमधून काही जण वाळू चोरी करून पुळूज मधून पुढे जात आहेत. त्याप्रमाणे त्यांचेकडील पथकाने पुळूज येथे थांबून सरकोली बांधर्याकडून दोन पिक अप वाहन वाळू चोरी करून येताना दिसले असता पुळूजमध्ये सदरच्या दोन्ही वाहनांना थांबवून त्यांचेवर कारवाई केली.सदर छाप्यामध्ये 2 पिक अप त्यामध्ये भरलेली वाळू असा एकूण 06,06,000 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरच्या वाळूचोरीबाबत आरोपी अभिजित पंडीत कराळे वय 22 वर्ष , हसन शरीफ इनामदार वय 24 वर्ष दोघे रा- सरकोली ता.पंढरपुर यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक चंदनशिवे हे करत आहेत

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षिक तेजस्वीनी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे नेतृत्वाखाली सपोनि आदिनाथ खरात,पोलीस शिपाई शिवाप्पा बिरसदार ,पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंशी,होमगार्ड सचिन मदने,होमगार्ड सोमनाथ सूळ यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: