आयर्लंडला पराभूत करत टीम इंडियाने विक्रम रचत पाकिस्तानला मागे टाकले
टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत t-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आपली विजयाने सुरुवात केली आहे. आयर्लंड ला आठ गडी राखून पराभूत करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली असून या सामन्यात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.
टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडशी झाला. भारताने हा सामना एक हाती जिंकत आयर्लंड ने दिलेले 97 धावांचे आव्हान दोन गडी गमावून 12.2 षटकात पूर्ण केले व हा एक हाती सामना जिंकला.आयर्लंडला पराभूत करत टीम इंडियाने विक्रम रचत पाकिस्तानला मागे टाकले आहे .
भारताने आयर्लंड ला आठ गडी राखून पराभव करतानाच भारताचा 29 वा विजय मिळवत वर्ल्ड t 20 कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानला मागे टाकले आहे. पाकिस्तानने t 20 वर्ल्ड कप मध्ये आत्तापर्यंत 28 विजय मिळवले तर श्रीलंका या यादीत टॉपला असून त्यांनी 31 विजय मिळवले आहेत .टीम इंडियाचा पुढील सामना आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी 9 जूनला होणार आहे. आतापर्यंत या मैदानावर गोलंदाजांचेच वर्चस्व असून हा सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतीय टीम मध्ये रोहित शर्मा कर्णधार, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली,सूर्यकुमार यादव,विकेटकीपर ऋषभ पंत ,संजू सॅमसन ,शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव ,युजवेंद्र चहल,अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह ,हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज असे आहेत.