छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त विचारांचा संपूर्ण विश्वात आदर – स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे
स्वेरीमध्ये ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०६/२०२४ – छत्रपती शिवाजी महाराजांचे कष्ट, गुणग्राहकता, न्याय-निवाडा, परिश्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकाभिमुखता, नेतृत्व, प्रशासन हे सर्व गुण पाहता त्यांचा आदर्श आज जगासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केले कार्य अद्भुत आहे म्हणून त्यांच्या कार्याला कोणत्याही मर्यादेत बांधता येत नाही. त्यांचे नेतृत्व, सवंगडी जमा करण्यासाठीचे कौशल्य, गड, किल्ले जिंकताना अवाढव्य शत्रूसमोर नियोजनबद्ध पद्धतीने आखलेली व्यूहरचना व मिळविलेले विजय या सर्व बाबी पाहिल्यास आज त्यांच्या अनेक गोष्टी अंगीकृत करणे गरजेचे आहे, आज ३५१ वर्षे झाली तरीही आपण छत्रपती शिवरायांचे संकल्प व संकल्पना याकडे अभिमानाने पाहतो कारण महाराजांची प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी व अनुकरण करण्यासारखी आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त विचारांचा संपूर्ण विश्वात आदर केला जातो, असे प्रतिपादन गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी केले.
गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्यावतीने ३५१ वा राज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी भव्य शिवमुर्तीची पूजा पत्रकार दिनेश खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व विशद करत होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वेरीतील सल्लागार डॉ.आर.एन. हरिदास यांनी सूत्रसंचालन केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून वंदन केले.
यावेळी पत्रकार कल्याण कुलकर्णी, धनंजय बागल, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मनियार, डी.फार्मसीचे प्राचार्य. प्रा.एस.व्ही.मांडवे,डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी.मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख डॉ.एम.एम.पवार, डॉ.डी.ए.तंबोळी, डॉ.एस.बी.भोसले, डॉ.एस.ए.लेंडवे, प्रा.मनसब शेख, प्राध्यापक वर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एम.एम.आवताडे, प्रा.आर.एस.साठे, डॉ.डी.एस.चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.