पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाचे -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे
जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे पर्यावरण दिन साजरा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ /०६/२०२४- दरवर्षी जगभरात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होय, त्यासाठी पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे व त्या वृक्षांची जोपासणा करणे महत्वाचे असलेबाबतचे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी व्यक्त केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गुरुवार,दि.६ जून २०२४ रोजी जिल्हा न्यायालय,पंढरपूर न्यायालयाच्या आवारामध्ये तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.
वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी न्यायाधीश श्रीमती एस.एस. पाखले,न्यायाधीश ए.ए. खंडाळे,न्यायाधीश एन.एस.बुद्रुक, न्यायाधीश पी.पी.बागुल,न्यायाधीश ए.एस. सोनवलकर, न्यायाधीश श्रीमती पी.एन. पठाडे,न्यायाधीश श्रीमती एस.ए. साळुंखे, न्यायाधीश श्रीमती पी.बी घोरपडे,पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.आर.बी. चौगुले, सचिव ॲड.अभियसिंह देशमुख, पंढरपूर बारचे पदाधिकारी ॲड.विजयकुमार नागटिळक,सरकारी विधीज्ञ श्रीमती गौरी कुलकर्णी, अधिक्षक आर. एस.बेंबळकर, वरिष्ठ लिपीक ए.ए.उत्पात,सिस्टीम ऑफिसर नईम मोमीन, केशव उंबरकर, विशाल ढोबळे, सतिश रणदिवे, वैभव माने तसेच विधीज्ञ, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.