खासदार अनिल देसाई यांचा शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या वतीने सत्कार

शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांचा शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्यावतीने सत्कार

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –शिवसेना भवन मुंबई येथे दि. १०/०६/२०२४ रोजी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजय झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या वतीने संभाजी शिंदे जिल्हाप्रमुख तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांचा दैनंदिनी, दिनदर्शिका व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ आणि जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे,प्रा. अजय दासरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top