मोदी आहेत नंबर वन त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मोदी आहेत नंबर वन त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Modi is number one, so the Opposition is sad – Union Minister of State Ramdas athawale
तिसरी आघाडी बनली तरी मोदींना काही फरक पडणार नाही

मुंबई दि. 22 – मोदी आहेत नंबर वन,
त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन !
मोदी देणार आहेत सर्व राज्यांना
विकासासाठी धन; म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा 2024 चा क्षण!

      अशा खास आपल्या काव्यमय शैलीत विरोधकांना टोला देत तिसरी आघाडी बनली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए ला काही फरक पडणार नाही. तिसरी आघाडी सारख्या आणखी कितीही आघाड्या बनल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली. 

 माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी तयार होत आहे.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राबाहेर फारसा प्रभाव नाही.  राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी निर्माण झाली तर त्यात काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही. त्यामुळे तिसरी आघाडी ही एनडीए चे नाही तर काँग्रेसचेच नुकसान करील असा दावा ना.रामदास आठवले यांनी केला. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: