सोलापूरच्या ‘फटे स्कॅम’ प्रमाणे मराठवाड्यातही ‘तीस-तीस स्कॅम’; तब्बल ४०० कोटींचा घोटाळा
पोलीस हतबल
तीस-तीस स्कॅममध्ये पोलिसांकडून फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन तक्रार देण्याचं अहवाहन केलं जात आहे. मात्र पोलिसात तक्रार केल्यास पैसे बुडातील अशी धमकी मध्यस्थी आणि राठोडच्या जवळ्याच्या लोकांकडून दिली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलीस सुद्धा हतबल झाले आहेत.
काय आहे ‘फटे स्कॅम’?
विशाल फटे नावाच्या व्यक्तीने बार्शीसह देशभरातील गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. त्यात उच्च शिक्षित नोकरदार, डॉक्टर, व्यापारी, पोलीस अधिकारी, पत्रकार आणि हिंदी चॅनेलच्या न्यूज अँकर्सचाही समावेश आहे. मात्र, अधिकृतपणे कुणीही तक्रार द्यायला तयार नाही किंवा बोलायला तयार नाहीत. त्यामुळे अल्गोरिदमच्या नावाखाली फैलावलेल्या या आर्थिक जाळ्यात कोण, कोण अडकले आहे याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात ४० पेक्षा अधिक लोकांनी आपली फसवणूक झाल्याचं पोलिसांना सांगितले असून, पोलिसांनी विशालचे वडील आणि भावाला शुक्रवारी मध्यरात्री सांगोला येथून अटक केली आहे.