डॉ.विजयकुमार शाह यांना पर्यावरण भूषण सन्मान 2026 प्रदान

डॉ.विजयकुमार शाह यांना पर्यावरण भूषण सन्मान 2026 प्रदान

पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी उल्लेखनीय कार्याची दखल

डॉ.विजयकुमार शाह यांना पर्यावरण संरक्षण, हवामान बदल जनजागृती आणि शाश्वत विकासातील उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट कौन्सिलतर्फे पर्यावरण भूषण सन्मान 2026 प्रदान.नवी दिल्ली येथे झाला सन्मान सोहळा.

New Delhi news: नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज– पर्यावरण संरक्षण, हवामान बदल प्रतिबंध,पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सांगली येथील डॉ.विजयकुमार शाह यांना वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट कौन्सिल तर्फे तिसऱ्या Environment Civilian Awards 2026 अंतर्गत प्रतिष्ठेचा पर्यावरण भूषण सन्मान प्रदान करण्यात आला.

हा सन्मान पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण व प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.डॉ.विजयकुमार शाह यांनी समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले असून हवामान बदला संदर्भात जनजागृती, वृक्षारोपण मोहिमा आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनांचा प्रसार यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात देशभरातील मान्यवर उपस्थित होते.पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा होत आहे.

डॉ.विजयकुमार शाह यांचा हा सन्मान पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Back To Top