Haridwar Hate Speech हरिद्वार हेट स्पीच: उत्तराखंड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई, ‘या’ धर्मगुरुला अटक


हायलाइट्स:

  • धर्म संसद प्रक्षोभक भाषण प्रकरणी मोठी कारवाई.
  • यती नरसिंहानंद गिरी यांना पोलिसांनी केली अटक.
  • सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर कारवाईला आला वेग.

हरिद्वार:हरिद्वार धर्म संसदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे देशभरात वादळ उठलेलं असताना उत्तराखंड पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पोलिसांनी आज याप्रकरणी धर्मगुरू यती नरसिंहानंद गिरी यांना अटक केली असून याआधी वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी यांनाही अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, यती नरसिंहानंद यांच्यावरील कारवाईला तीव्र विरोध सुरू झाला असून पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमली आहे. ( Haridwar Hate Speech Latest Breaking News )

वाचा : भाजपची वेगळी चाल! योगी अयोध्येतून नाही, ‘या’ मतदारसंघातून लढणार

हरिद्वार येथे आयोजित धर्म संसदेत वक्त्यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. मुस्लिम धर्माला लक्ष्य करून चिथावणी देणारी भाषा वापरण्यात आली होती. त्यामुळे देशभरात वादळ उठले आहे. याप्रकरणी कारवाई व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्यात आली आहे. त्याचवेळी काही सामाजिक संघटना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांना पत्र लिहून त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने बुधवारी याबाबत उत्तराखंड सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले होते. कारवाईबाबत १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे त्यात बजावण्यात आले होते. त्यानंतर कारवाईला वेग आला असून पहिली अटक उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी यांना करण्यात आली होती. त्यानंतर आज यती नरसिंहानंद गिरी यांनाही अटक करण्यात आली आहे. नरसिंहानंद यांना अटक करून हरिद्वारमधील पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नरसिंहानंद यांच्या अटकेला विरोध करण्यात येत असून पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे.

वाचा : करोनाने केली कोंडी!; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, या तारखेपर्यंत…

हेट स्पीच प्रकरणी पोलिसांनी एकूण दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात अन्नपूर्णा यांचेही नाव असून येत्या काही दिवसांत आणखीही काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

तुम सब मरोगे…

वसीम रिझवी यांना नारसन येथून हरिद्वार येथे येत असताना अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्यासोबत यती नरसिंहानंद हेसुद्धा होते. त्यांनी रिझवी यांच्या अटकेला विरोध केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी माझ्यावरही गुन्हा दाखल आहे. तेव्हा रिझवी यांना अटक करणार असाल तर मलाही अटक करा, असे नरसिंहानंद म्हणाले होते. मात्र, आम्ही प्रोटोकॉलनुसार कारवाई करणार असे पोलिसांनी सांगितले असता ते भडकले होते. ‘तुम सब मरोगे और अपने बच्चों को भी मरवाओगे’, अशी धमकी त्यांनी पोलिसांना दिली होती.

वाचा : चन्नी, सिद्धू मैदानात; सोनू सूदची बहीण आणि या गायकालाही काँग्रेसचं तिकीटSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: