पूरग्रस्त गावांसाठी मदत करणाऱ्या संस्थांचा सोलापूरात गौरव:
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 48 पूरग्रस्त गावांत मदतकार्य करणाऱ्या संस्थांचा हॉटेल चित्र एक्झिक्यूटिव्ह, सम्राट चौक येथे सत्कार. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,भारतीय जैन संघटना,इंडियन रेड क्रॉस सोसायटी आदींचा संयुक्त उपक्रम.
SolapurNews:सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज: सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 48 पूरग्रस्त गावांमध्ये विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या मदतकार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार समारंभ सम्राट चौक येथील हॉटेल चित्र एक्झिक्यूटिव्ह येथे आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम Family Planning Association of India सोलापूर शाखा, भारतीय जैन संघटना सोलापूर, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सा विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय तसेच Indian Red Cross Society सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
पूरग्रस्त गावांमध्ये अन्नधान्य, औषधे, आरोग्य सेवा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात पुढे करणाऱ्या संस्थांचे यावेळी कौतुक करण्यात आले.या
कार्यक्रमात IPPF चे केंद्रीय अधिकारी डॉ.अपूर्वा रुस्तोगी, मुंबई मुख्यालयाचे अधिकारी डॉ.अमित किटुकुले,डॉ. श्रीकांत येळेगावकर,शक्ती सागर ढोले,नागनाथ तेली, भारतीय जैन संघटनेचे राज्य पदाधिकारी केतनभई शहा तसेच FPA चे डॉ. सुगतरत्न गायकवाड व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

यावेळी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील आणि मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मता आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला असून संकटाच्या काळात सर्व संस्था एकत्र येऊन कार्य करतात याचे हे उत्तम उदाहरण ठरले.







