‘अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा’


लातूर : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीस आराम पडावा,’ अशी सदिच्छा व्यक्त करीत ‘अजितदादांवर किंवा ‘राष्ट्रवादी’वर विश्वास नसेल, तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवावा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या,’ अशी मागणी माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने मंत्रिमंडळही भरकटले आहे.

अगोदरच करोना महामारीचे संकट वाढत असताना कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. बलात्कार, खून, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत असून, राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत. अशा स्थितीत, मुख्यमंत्री मात्र प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन कारभारातही लक्ष घालू शकत नसल्याने राज्याचे अतोनात नुकसान होत आहे. दीर्घकाळ अनुपस्थित असल्यास पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची प्रथा अमलात आणण्याची हीच ती वेळ असून, आता राज्याला अधिक अस्थिरतेकडे ढकलण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हस्तांतरित करून ठाकरे यांनी राज्यकारभारात स्थैर्य आणावे, अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.

वाचाः पालकांची चिंता वाढली! या जिल्ह्यात लहान मुलांभोवतीही करोनाचा विळखा होतोय घट्ट

करोनास्थितीचा आढावा घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी निमंत्रित केलेल्या महत्त्वपूर्ण दूरसंवाद बैठकीसही ते प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. सलग अडीच तास बसणेदेखील त्यांना शक्य नाही, अशी कबुली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिलेली असल्याने, उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विश्रांती घेऊन ठणठणीत बरे व्हावे, अशा सदिच्छाही निलंगेकर यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक गंभीर प्रश्न टांगणीवर असून, संकटे आणि समस्यांनी घेरलेल्या महाराष्ट्रास अधिक काळ निर्णायकी ठेवणे योग्य नाही, असे मत माजी निलंगेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

वाचाः
काय सांगता! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात करोना रुग्णांध्ये पुरुषांची संख्या अधिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: