संस्कृति,परंपरा जपताना सर्वांनाच आनंद मिळतो – रवि वसंत सोनार
सोनार दांपत्यांकडून बाळगोपाळांना बोरन्हाण…किंक्रांत दिनी जपली सामाजिक बांधिलकी….
पंढरपूर /प्रतिनिधी :- ज्यावेळी आपण आपली संस्कृति आणि परंपरा जपत असतो त्यावेळी आपल्या बरोबर सर्वांनाच आनंद मिळत असतो.सूर्याच्या मकरसंक्रमणावेळी वातावरणात अनेक बदल होत असतात. त्यामुळे बाळगोपाळांना निसर्गातील उपलब्ध फळे व सकस आहार मिळावा. त्यांच्या आवडीचे चुरमुरे बत्तासे सेवनाचा आनंद मिळावा यासाठी बोरन्हाण हा सोहळा परंपरेनुसार सुरू ठेवणे आवश्यक आहे, असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले.
ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या बाळगोपाळांच्या बोरन्हाण प्रसंगी बोलत होते.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या परिसरातील बाळगोपाळांसोबत सोनार परिवारातील नात सानवी संदेश सोनार हिच्या बोरन्हाण प्रसंगी कवी सचिन कुलकर्णी, निषाद प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. मनिषाताई कुलकर्णी, डॉ. सचिन लादे, सौ. अंजलीताई लादे, स्वाद फुडचे उद्योजक संजय कुलकर्णी, सौ. दिपालीताई कुलकर्णी, कवी गणेश गायकवाड, गोपाळ माळी, रॉबिन हूड आर्मीचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रेवती सोनार, ओंकार सोनार, शिवरंजनी कुलकर्णी आणि सुरभी कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.