धक्कादायक! न्यूड डान्स, अनैसर्गिक सेक्स, सामूहिक बलात्कार… बिल्डर पतीच निघाला नराधम


इंदूर : इंदूरमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नराधम पतीने पत्नीचा असा छळ केलाय की ते ऐकून अंगावर काटे येतील. फार्म हाऊसमध्ये मित्रांसमोर पत्नीला न्यूड डान्स करायला लावत होता, असा आरोप आहे. आरोपी पतीने मित्रांसोबत इंदूर येथील त्याच्या फार्म हाऊसवर पत्नीवर अनेकदा सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढचं नव्हेत तर अनैसर्गिक सेक्स करून पत्नीचा छळ केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून इंदूर पोलिसांनी रविवारी वेगवेगळ्या ठिकाणांहून तिच्या पतीसह ५ जणांना अटक केली आहे.

आधीच विवाहित, पण तरुणीला फसवून केले दुसरे लग्न

पीडित महिला छत्तीसगडची रहिवासी आहे. ती एक सरकारी शिक्षक आहेत. आरोपी पतीसोबत पीडित महिलेची ओळख ही मेट्रिमोनियल साइटवरून झाली. यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नात पतीच्या कुटुंबातून कोणीही आले नव्हते. लग्नासाठी तो एकटाच आला होता. आरोपी आधीच विवाहित आहे, असा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केल्याचं इंदूर पोलिसांनी सांगितले.

पतीने मित्रांसह अनेकदा केला सामूहिक बलात्कार

पती आणि त्याच्या मित्रांनी नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एका फार्म हाऊसमध्ये आपल्यावर अनेकदा सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केला. सामूहिक बलात्कारादरम्यान आपल्या गुप्तांगावर जळत्या सिगारेटने चटके दिले जात होते. मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली जात होती, असा आरोप पीडित महिलेने केल्याचं पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

पीडित महिला माहेरी

कशीतरी आरोपींच्या तावडीतून सुटली आणि छत्तीसगडमध्ये माहेररी पोहोचली. तेव्हा आरोपींमधील एकजण तिथेही पोहोचला. आरोपी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, असा महिलेने केला आहे.
सावधान! राजस्थानमध्ये पर्यटनाला जाताय? मग त्यापू्र्वी ही बातमी नक्की वाचा…

५ आरोपींना अटक

महिलेने नोंदवलेल्या एफआयआरनुसार तिच्या पतीसह इतर चार जणांना मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Chinese Spying Case : चिनी गुप्तचरांना संवेदनशील माहिती पुरवली; ‘त्या’ पत्रकारावर मोठी कारवाई

‘न्यूड पार्टी व्हायची’

फार्म हाऊसमध्ये आधी न्यूड पार्टी व्हायची. पती आपल्याकडूनही हे काम करून घेत होता. नोकरांना तो आपले कपडे लपवायचा. आपल्याला न्यूड राहण्यासाठी भाग पाडले जात होते. तिथे बाहेरूनही मुली यायच्या. न्यूड डान्स केल्यानंतर सर्वजण आपल्यावर एक-एक करून बलात्कार करायचे, असे गंभीर आरोप पीडित महिलेने केले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.