हिंगोली जिल्ह्यातल्या ‘या’ गावात ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद


हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने असल्यामुळे हिंगोली जिल्हा प्रशासनाने या गावात सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या सात दिवसांच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सूचनेनुसार आज कुरुंदा गावांमध्ये तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थिती मध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी, तलाठी, सरपंच, उपसरपंच, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

१७ जानेवारी २०२२ पासून सात दिवसासाठी कुरुंदा येथील सर्व व्यापारी आस्थापना, बाजार ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील सर्व व्यापारी दुकानदार, हॉटेलचालक, गावकरी यांनी सदरील सूचनेचे पालन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा सूचना दिल्या आहेत.

या गावातील कोरोना रुग्णांचा आकडा १६ च्या वर पोहोचला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज नव्याने तब्बल ७४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली असून, हा एकूण जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २१६ झाला आहे. नागरिकांसोबत प्रशासनाची सुध्दा चांगलीच तारांबळ उडाली आहे. कुरुंदा गावांमध्ये सध्या पोलीस प्रशासनासह स्थानिक प्रशासन व नागरिक गावात जाऊन जनजागृती करत असल्याचे दिसून येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: