स्वामी विवेकानंद व स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम
उमा महाविद्यालय, पंढरपूर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त समर्पण दिवस प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
dnyanpravah-arpan-divas-uma-college-pandharpur
Pandharpur news: पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : अखिल भारतीय ग्राहक पंचायती च्यावतीने उमा महाविद्यालय, पंढरपूर येथे समर्पण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतातील युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद तसेच स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.प्रा. देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

प्रांत सहसचिव दीपक इरकल यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत ग्राहक चळवळीचा सिद्धांत स्पष्ट केला. प्रांत सदस्य विनोद भरते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची कार्यपद्धती व आजच्या काळातील ग्राहक चळवळीची गरज अधोरेखित केली.
उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी या थोर व्यक्तींच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी,असे आवाहन केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते,तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे व तालुका सहसचिव आझाद अल्लापुरकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देशपांडे यांनी केले.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा प्रेरणादायी समर्पण दिवस पंढरपूर येथे साजरा.



