सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा सराफा बाजारातील सोने-चांदीचा दर


हायलाइट्स:

  • सोने आणि चांदीमध्ये तेजी कायम आहे.
  • सोने ४८ हजारांच्या आसपास आहे.
  • चांदीचा भाव ६१ हजारांवर आहे.

मुंबई : करोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी कायम आहे. सोने ४८ हजारांच्या आसपास असून चांदीचा भाव ६१ हजारांवर आहे. आज सोने ७० रुपयांनी तर चांदी १८८ रुपयांनी महागली आहे. यापूर्वी शुक्रवारी सोने दरात २६० रुपयांची तर चांदीमध्ये २५० रुपयांची वाढ झाली होती.

अवघ्या ३३० रुपयांत मिळणार २ लाखांचा लाभ; जाणून घ्या सरकारच्या या योजनेबाबत
आज सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७८५४ रुपये इतका वाढला आहे. त्यात ७६ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी आजच्या दिवसात सोन्याचा भाव ४७८५७ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६१७९१ रुपये इतका असून त्यात १८८ रुपयांची वाढ झाली.

पेट्रोल-डिझेलचा भाव ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१०० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४९१०० रुपये इतका आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१३० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१४२० रुपये आहे.आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५३४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४४० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९८८० रुपये इतका आहे.

अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.
जागतिक कमॉडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १८१४.०८ डॉलर प्रती औंस इतका आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली. यूएस गोल्ड फ्युचर्स १८१५ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.१ टक्के घसरण झाली. चांदीचा दर प्रती औंस २२.८९ डॉलर इतका आहे. त्यात ०.३ टक्के घसरण झाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: