मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीने दिल्लीत दरवळला महाराष्ट्राचा सुगंध – भरत जाधव

महाराष्ट्र सदनात maharastra sadan dehlhi मराठी संस्कृतीची marathi sansnkruti मेजवानी : मकर संक्रांती महोत्सव makar sankranti व हुरडा पार्टीने दिल्लीत दरवळला महाराष्ट्राचा सुगंध – भरत जाधव

महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे आयोजन.अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन,मराठी संस्कृतीचा भव्य जागर.

Maharastra sadan navidelhi :नवी दिल्ली,दि.९ जानेवारी २०२६ :दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित मकर संक्रांती महोत्सव व /हुरडा पार्टी हा मराठी संस्कृती,खाद्यपरंपरा,ग्रामीण जीवनशैलीचा अनोखा संगम ठरला आहे.या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी बोलताना भरत जाधव म्हणाले की,दिल्लीसारख्या महानगरात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि खाद्यसंस्कृती पोहोचवताना मिळणारा आनंद शब्दात मांडता येणार नाही. महाराष्ट्र सदनात प्रथमच आलेला हा अनुभव मनाला सुखद धक्का देणारा आहे.

दिल्लीकरांना मराठी मातीचा गंध

अभिनेते भरत जाधव पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वसामान्यपणे अनुभवायला मिळणारी हुरडा पार्टी, परराज्यातील मराठी माणसांसाठी मोठी पर्वणी ठरते. या उपक्रमामुळे दिल्लीतही महाराष्ट्राचा गावरान सुगंध दरवळत असून दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संस्कृतीच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख-आर.विमला

निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी महोत्सवाच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची ओळख निर्माण केली, त्याच परंपरेचा वारसा आज दिल्लीसह देशभर पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

मकर संक्रांत सण विविध राज्यांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी महाराष्ट्राची खास खाद्यसंस्कृती विशेषतः हुरडा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

बचत गटांना बाजारपेठ, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी सांगितले की, या महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अस्सल रानमेवा, खाद्यपदार्थ व हस्तकला उत्पादने दिल्लीत विक्रीसाठी मांडण्यात आली असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.

अस्सल गावरान चवींची रेलचेल

या महोत्सवात महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक, जळगाव, रायगड, परभणी, जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे.

एकूण १६ स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यामध्ये ज्वारीचा कोवळा हुरडा,लसूण चटणी, शेंगदाणा कूट,गूळ, साजूक तूप, ताक,पिठलं-भाकरी, भरीत-भाकरी,बटाटेवडे, भजी, ऊस, बोरं, ओला हरभरा यांसारख्या अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद घेता येत आहे.याशिवाय कॉपर मेटलचे दागिने व हस्तकला वस्तू देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

कृषी योजनांची माहिती व GI पिकांचे सादरीकरण

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.यामध्ये —महाडीबीटी पोर्टल,महाविस्तार ॲप,
महाराष्ट्रातील ३८ GI मानांकन प्राप्त पिके
यांचे सादरीकरण करण्यात आले आहे.

११ जानेवारीपर्यंत महोत्सव सुरू

११ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात महोत्सवात सहभागी होऊन महाराष्ट्राचे आदरातिथ्य,संस्कृती आणि खाद्यपरंपरेचा अनुभव घेण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Back To Top