मकरसंक्रांतीनिमित्त महिला भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था : पुरुष भाविकांनी मुखदर्शन घ्यावे – विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे आवाहन
मकरसंक्रांतीनिमित्त पंढरपूर श्री विठ्ठल- रुक्मिणी vithal rukmini mandir मंदिरात महिला भाविकांसाठी विशेष दर्शन नियोजन. पुरुष भाविकांनी मुखदर्शन घ्यावे, मंदिर समितीचे आवाहन.
Pandharpur VitthalRukmini mandir news :पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १० जानेवारी : पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार मकरसंक्रांती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने महिला भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी मंदिर समितीच्यावतीने विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

भोगी १३ जानेवारी रोजी रुक्मिणी मातेचे विशेष धार्मिक विधी
मकरसंक्रांतीपूर्वी येणाऱ्या भोगी दिनी दि. १३ जानेवारी पहाटे ३.०० ते ४.३० — श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा होणार आहे.
भोगी निमित्त माता व भगिनींना श्री रुक्मिणी मातेस भोगी अर्पण करावयाची असल्यास पहाटे ४.३० ते ५.३० या वेळेत मंदिरात करता येणार आहे.
५.३० नंतर श्री रुक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील.
सकाळी ६.३० वाजेपर्यंत दर्शन सुरू करण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल दर्शन व्यवस्था १३ जानेवारी
भाविकांच्या सोयीसाठी दि.१३ जानेवारी रोजी पहाटे ४.३० ते ५.४५ — श्री विठ्ठलाची काकडा आरती व नित्यपूजा
६.०० नंतर — पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे.
मकरसंक्रांती (१४ जानेवारी) रोजी विशेष दर्शन व्यवस्था
दि. १४ जानेवारी (मकरसंक्रांती) रोजी नेहमीच्या वेळेत
श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झाल्यानंतर अलंकार परिधान करून दर्शन सुरू करण्यात येणार आहे.या दिवशी जास्तीत जास्त माता व भगिनींना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी
पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर समिती च्यावतीने करण्यात आले आहे.
१५ जानेवारी रोजी नियमित वेळापत्रक
दि. १५ जानेवारी रोजी श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत पार पडणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना
मकरसंक्रांती कालावधीत वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने पुढील उपाययोजना केल्या आहेत —दर्शन रांग व्यवस्थापन,कमांडो व सुरक्षा कर्मचारी नियुक्ती,
टोकन दर्शन बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद,स्वच्छतेसाठी विशेष नियोजन,व्हीआयपी दर्शनावर निर्बंध,पूजेची संख्या कमी करून भाविकांना अधिक वेळ दर्शन,भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व सुलभ दर्शन मिळावे यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मंदिर समितीचे मार्गदर्शन
हा संपूर्ण उत्सव मंदिर समितीचे सह- अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत असल्याची माहिती प्र.व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली.






