अवघ्या ३३० रुपयांत मिळणार २ लाखांचा लाभ; जाणून घ्या सरकारच्या या योजनेबाबत


हायलाइट्स:

  • पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना.
  • ही एक परवडणारी मुदत विमा योजना आहे.
  • या अंतर्गत ३३० रुपयांच्या प्रीमियमवर दरवर्षी २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

मुंबई : पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक परवडणारी मुदत विमा योजना आहे. या अंतर्गत ३३० रुपयांच्या प्रीमियमवर दरवर्षी २ लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास दाव्याची रक्कम त्याच्या नातेवाईकांना किंवा नॉमिनीला (नामांकित/सदस्य) दिली जाते. या विमा योजनेसाठी कोण पात्र आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

खूशखबर ; SBI आणि HDFC ने ठेवींवरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवे दर
पीएमजेजेबीवाय (PMJJBY) १८ ते ५० वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे, ज्यांचे बँकेत एक खाते आहे. तसेच जे या योजनेत सामील होतात, त्यांच्या खात्यातून स्वयं-डेबिट करण्यास संमती देतात.

वेध अर्थसंकल्पाचे; कौशल्य विकास आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता
२ लाख रुपयांची जीवन सुरक्षा १ जून ते ३१ मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे आणि ती अक्षय आहे. या योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जोखीम संरक्षण दोन लाख रुपये आहे. प्रीमियमची रक्कम दरवर्षी ३३० रुपये आहे. हे ग्राहकांच्या बँक खात्यातून दरवर्षी एका हप्त्यात ३१ मे रोजी किंवा त्यापूर्वी स्वयं-डेबिट केले जाते. ही योजना लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि इतर सर्व लाइफ इन्शुरन्सद्वारे ऑफर केली जात आहे.

तूर्त ‘या’ कंपनीने प्रस्ताव गुंडाळला; ‘IPO’चे लागते होते वेध पण तिसऱ्या लाटेने आणले जमिनीवर
तुम्ही हा प्लॅन एलआयसीमार्फत घेऊ शकता, तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत देखील याबद्दल माहिती घेऊ शकता. क्लेम मिळविण्यासाठी तुम्हाला त्या विमा कंपनीकडे किंवा जिथून विमा काढला आहे, त्या बँकेकडे जाऊन दावा करावा लागेल. मृत्यू प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक कागदपत्रेही तेथे जोडावी लागतील.

हा टर्म इन्शुरन्स असल्याने, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच यामध्ये कव्हरेजचा लाभ मिळेल. मुदत संपल्यानंतरही तो ठीक राहिल्यास योजनेंतर्गत कोणताही लाभ दिला जाणार नाही. तसेच इतर काही स्थिती आहेत, जिथे सदर व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: