ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या शेतात चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल


पैठण : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांच्या पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात असलेल्या शेतात चोरी झाली आहे. त्यांच्या शेतात राहत असलेल्या सालदार सर्जेराव अभंग यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारलाय. अभंग यांच्या घराच्या मागे बांधलेल्या शेळ्या घेऊन चोरटा फरार झाला आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ( paithan midc police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक चव्हाण यांच्या शेतात सालदार असलेले सर्जेराव अभंग यांचा मुलगा गणेश सर्जेराव अभंग ( वय 23 वर्षे ) याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ‘त्याचे आई-वडील कातपुर शिवारातील अशोक चव्हाण यांच्या शेतात गेल्या २० वर्षांपासून मजुरी करतात. ते राहत असलेल्या घराच्या मागे बनवलेल्या पडवीमध्ये त्यांच्या मालकीच्या दोन शेळ्या आणि एक लहान पाट बांधून ठेवतात. ती चोरीला गेली आहे.’

सोमवारी ( २४ जानेवारी रोजी ) रात्री आठ वाजता वडिलांनी घेतलेल्या औरंगाबाद-पैठण रोडववर असलेल्या प्लॉटवर सुरू बांधकम सुरु असल्याने गणेश रात्री झोपण्यासाठी तिकडे गेला होता. मात्र सकाळी घरी आल्यावर घराच्या पाठीमागे बांधलेल्या शेळ्या दिसून आल्या नसल्याने गणेश आणि त्याच्या वडिलांनी आजूबाजूला शोधाशोध केली.

परिसरात बराच शोध घेतल्यानंतर सुद्धा शेळ्या आढळून आल्या नाहीत. तसेच याच परिसरात असलेल्या एका शेतवस्तीवर सुद्धा रात्री काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत ऊस कामगारांचे मोबाईल चोरून नेल्याचं समोर आलं. त्यामुळे आपल्याशेळ्या सुद्धा याच चोरट्यांनी नेल्या असल्याचं स्पष्ट झाल्याने, गणेश याने पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत एकूण पंधरा हजाऱ्याच्या तीन शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: