माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पुढील रणनीतीसाठी पंढरपुरात महत्वपूर्ण बैठक

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दि.२९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या आदेशाने या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती शिवसेना उबाठा गटाचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.

     शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ हे या बैठकीत मार्गदर्शन करणार असून या बैठकीत शिवसेना प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके,उपनेत्या अस्मिता गायकवाड,उपनेते शरद कोळी,जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे,स्वप्नील वाघमारे सहसचिव युवा सेना,युवा सेना जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे,सचिन बागल,महिला आघाडी जिल्हा संघटक ऍड.पूनम अभंगराव,आशा टोणपे,शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शिवाजी जाधव,डॉक्टर्स सेल महिला जिल्हा संघटक डॉ राजश्री क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

      या बैठकीस उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, सर्व विधानसभा संपर्क प्रमुख,विधानसभा प्रमुख,विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक,उपतालुकाप्रमुख, शहर प्रमुख, शहर समन्वयक, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, गटप्रमुख, बुथ प्रमुख, बीएलए एजंट, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आदी पदाधिकारी तसेच युवासेना,संलग्न संघटनेचे पदाधिकारी,महिला आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार असून त्यामुळे आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *