जेंव्हा निसर्ग कोपतो तेंव्हा….
जेंव्हा निसर्ग कोपतो तेंव्हा….
पावसाचा पत्ता नाही
डोळ्यांना विसावा नाही
मनाला स्थैरता नाही
चिंतेला सीमा नाही
स्वप्नाला भविष्य नाही
खळ्यावर मळणी नाही
जीतराबाना सकस चारा नाही
घरात आनंद नाही
नेत्रातील अश्रू बोलत नाही
शब्दांना अर्थ राहत नाही
निसर्गाचा कोप मर्यादा नाही
आत्मविश्वासा शिवाय पर्याय नाही
जात……
जात ही जातच असते
डोक्यातून ती कधीच जात नसते
पेटवणारांचेसाठी ती आग असते
मतासाठी धागा असते
मेल्यावरही ती कायम असते
जाईल तिथे लिहावीच लागते
राजकारणात ती सांगावीच लागते
निवडणुकीत वापरलीच जाते
सवलतीसाठी ती वरदान असते
तर कांहीना ती शाप ठरते
कांहींची ती अस्मिता असते
अशी ती जात असते
मरेपर्यंत ती छळत असते
माणसाला ती कायम वेठीस धरत असते
कधी शांती तर कधी वांती
करण्यास भाग पाडते
तीच तर जात असते
कांही केले तरी ती
जिवंत राहत असते “!!
"सुप्रभात"
“आपण कोणाच्या संगतीत राहतो त्यावर
प्रत्येकाची किंमत होत असते “!!
आनंद कोठडीया,जेऊर , ता.करमाळा
९४०४६९२२००