भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
अमरावती – भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील विविध राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील फक्त एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली.
खासदार नवनीत राणा
देशभरात भाजपकडून यादी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे यात खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदार संघात भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असली तरी त्यांना प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा तीव्र विरोध आहे .नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता.
खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर त्यांनी सांगितले की आपला विरोध नवनीत राणा यांना कायम राहणार आहे आणि त्यांच्याविरुद्ध काम करून आम्ही त्यांना पाडू.आता आम्ही विरोध केल्यामुळे त्यांनी आम्हाला महायुतीत ठेवायचं किंवा नाही ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पंतप्रधान मोदी यांचे खूप खूप आभारी असून अमरावतीच्या लोकांनी मला इथपर्यंत आणलं त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला त्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे सांगून त्यांचे आभार मानते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.