सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी मिलिंद शहा दाम्पत्याचा मोठा हातभार

गोपाळ रावसाहेब भोसले यांनी डॉ राजेंद्र शहा यांच्या स्मरणार्थ सिमेंटची पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून दिली

सरकोली/ ज्ञानप्रवाह न्यूज – सरकोली ता.पंढरपूर येथील पर्यटन स्थळ निर्मिती मध्ये वृक्षारोपणास पाणीपुरवठा करण्यासाठी सरकोलीचे शेतकरी मिलिंद शहा यांनी डॉ राजेंद्र शहा व डॉ स्नेहल शहा यांच्या स्मरणार्थ डॉ स्नेहराज शहा पाणीपुरवठा योजना पाईपलाईन साठी यापूर्वी 35 हजार रुपये दिले आहेत.आता उन्हाळ्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी मिलिंद शहा व सौ मोनिका शहा या दांपत्यानी तीन एचपी इलेक्ट्रीक मोटर,पाईप,पेटी,सर्विस वायर असा 25501/- रुपयाचे साहित्य पर्यटन स्थळास दिनांक 26/03/2024 रोजी भेट दिले.

सरकोली पर्यटन स्थळ विकास समितीने ही मोटार नदीवर बसून चालू केली आहे.सन 1973 च्या सुमारास डॉ राजेंद्र शहा व डॉ स्नेहल शहा हे सरकोली येथे शेती करण्यासाठी आले होते.त्यांना शेतीची व शेतीवर काम करणाऱ्या कुटुंबांना जगविण्याची आवड होती. त्यांनी अनेक शेतमजुरांना काम दिले.शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी व इतर अडचणीस मदत केली . सरकोली मध्ये अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करून उभे केले.त्यांचाच वारसा घेऊन मिलिंद शहा व सौ मोनिका शहा दांपत्य मदत करत आहेत.

सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीचे काम सुरू केले त्यावेळी रोपांना पाणी देण्यासाठी पाईप लाईन ची मागणी नागनाथ कपने, नागनाथ कराळे व दुर्योधन रोकडे महाराज यांच्या मध्यस्थीने करण्यात आली होती त्यास लगेच शहा कुटुंबाने होकार दिला.आत्तापर्यंत त्यांनी सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी 60,501/-₹ रुपयांचे पाणीपुरवठ्याचे साहित्य घेऊन दिले आहे .त्यांच्या या निसर्गासाठी पशुपक्ष्यांसाठी ,पर्यटकांसाठी, पर्यावरण संतुलनासाठी सहकार्याने कामास पाठबळ देण्याचे काम केले आहे. यापूर्वी श्री भैरवनाथ मंदिराजवळ गोपाळ रावसाहेब भोसले यांनी डॉ राजेंद्र शहा यांच्या स्मरणार्थ सिमेंटची पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून दिली आहे.

सरकोली पर्यटन स्थळावर अनेक कामे करावयाची आहेत. त्याकरीता पैशाची, साहित्याची आवश्यकता आहे. जे कोणी स्थळ निर्मितीस आर्थिक मदत देतील, मदत करतील त्यांच्या प्रिय व्यक्तीचे नाव त्या स्थळास देण्यात येईल. व इतर स्वरूपातील मदतीची पावती देवुन, फलकावर नावे लिहून ठेवण्यात येतील असे सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या मा पोलीस अंमलदार विलास श्रीरंग भोसले 9923433535 यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *