महाशिवरात्री निमित्त इंडियन आयडॉल विजेती अंजली गायकवाडची शंभो शंकरा भजनसंध्या

पंढरपुरात महाशिवरात्री निमित्त इंडियन आयडॉल विजेती अंजली गायकवाडची शंभो शंकरा भजनसंध्या; नेत्रतपासणी, रक्तदान व महाप्रसादाचे आयोजन

पंढरपूर येथे महाशिवरात्री निमित्त बेलीचा महादेव सेवा परिवारातर्फे इंडियन आयडॉल विजेती अंजली गायकवाड हिची भव्य शंभो शंकरा भजनसंध्या आयोजित.मोफत नेत्रतपासणी,आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन.

Pandhapur news:पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११: महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर येथे बेलीचा महादेव सेवा परिवारा च्यावतीने विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंडियन आयडॉल विजेती व महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड हिच्या ‘शंभो शंकरा’ भजनसंध्येचा विशेष समावेश आहे.

रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बेलीचा महादेव मंदिरासमोर, प्रदक्षिणा रोड पंढरपूर येथे ही भजन संध्या रंगणार आहे.अंजली गायकवाड हिला हार्मोनियमवर अंगद गायकवाड, तबल्यावर सोहम गोराणे, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे आणि टाळावर माऊली पिसे साथसंगत करणार आहेत.

महाशिवरात्री निमित्त तीन दिवस विविध सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शनिवार,१४ फेब्रुवारी: सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गरजूंकरिता मोफत नेत्रतपासणी व मोफत आरोग्य सेवा शिबिर.
रविवार, १५ फेब्रुवारी: सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान भव्य रक्तदान शिबिर. सर्व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रविवार रात्री ९ वाजता: भजनसंध्येनंतर शंभू महादेवाची महाआरती.
सोमवार,१६ फेब्रुवारी: दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन.
धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे हे उपक्रम पंढरपूरकरांसाठी प्रेरणादायी ठरणार असून सर्व महादेव भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बेलीचा महादेव सेवा परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Back To Top