कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे
पुणे / डॉ अंकिता शहा : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुण्याचे आहे.कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची शिवसेना नेत्या आणि विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांनी सांत्वनपर भेट घेऊन विचारपूस केली.

या सांत्वनपर भेटीनंतर डॉ.नीलम गोऱ्हे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे या दोन्ही कुटुंबीयांची आज भेट घेतली.या दोन्ही कुटुंबीयांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यातील प्रामुख्याने सांगायचे झाल्यास या दोन्ही कुटुंबियांच पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार सोबत पाठपुरावा केला जाईल तसेच या कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.