सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८/०७/२०२४- पंढरपूर मध्ये दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने एस टी स्टॅण्डवर, मंदीर परीसरात,मठात,शिवपुराण कार्यक्रमात होणा-या गर्दीचा फायदा घेवुन तसेच विरळ वस्तीच्या ठिकाणी दिवसा बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडुन ३४ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत असले श्री.विठ्ठल मंदीरामध्ये दर्शनाकरीता एसटीने प्रवास करून येणा-या भाविकांची गर्दी ही नवीन एस टी स्टॅण्डमध्ये प्रत्येक वारीला व अधुनमधुन होत असते.

सदर एसटी मध्ये जागा पकडण्यासाठी व एसटी मध्ये वर चढत असताना भाविक प्रवासी यांचे गळ्यातील सोन्याचे मौल्यवान दागिने चोरण्याचे प्रकार झाल्याने त्याबाबत पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणेत आले होते.सदरचे चोर हे चोरी करून एक तर एसटी मध्ये चढुन दुसरीकडे जायचे अन्यथा एसटी मध्ये चढुन त्याचे दुसरे सहकारी यांचेकडे सदरचे सोन्याचे दागिणे सुपुर्द करीत असल्याने एसटी स्टॅण्ड वरील शिवपुराण कार्यक्रमा दरम्यान झालेल्या गर्दीत व विरळ वस्तीचे ठिकाणी बंद घरावर पाळत ठेवुन सदर कार्यक्रमातील व घरातील सोन्याचे दागिने घेवुन पळून जात होते.

पंढरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील एसटी स्टॉप,नविन एसटी स्टॅण्ड व एसटी थांबण्याची ठिकाणे, पंढरपुर शहरातील श्री विठ्ठल मंदीराचे सभोवतालचा गर्दीचा परिसर, शिवपुराण कार्यक्रमात होणारे गर्दीचे ठिकाणी व विरळ वस्तीचे बंद घराचे ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवुन गोपनीय बातमीदारा मार्फत पंढरपुर एस टी स्टॅण्ड येथे येत असलेले नव-नविन चोर हे कोणत्या गावातुन किंवा परराज्यातुन येतात काय, रेकॉर्डवरील गुन्हेगार आले होते का ? याबाबत माहिती काढली असताना गोपनिय बातमीदारा कडुन एक बातमी मिळाली की, सदरचे आरोपी हे पंढरपुर शहर व इतर पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील आरोपी १. सखाराम उर्फ सिकंदर छगन वाघमारे रा.नाळवंडी नाका बीड, २. शाहरूख हमीद पठाण रा.शहनशाह नगर बीड, ३.अर्जुन भिमराव बाबर रा.पुरग्रस्त कॉलनी बीड, ४.रत्नाबाई बळी शेंडगे रा. इंदापुर, ५.ताई नाना दुबळे रा.कोरफळे, ता. बार्शी, ६.सुजाता युवराज बाबर रा.कोरफळे, ता.बार्शी, ७ नितीन धर्मा किरतकरवी रा. कोरफळे, ता.बार्शी जि.सोलापूर, ८. शंकर विठ्ठल झेंड रा.पंढरपुर,९.महानंदा राम राठोड रा.कानडी पिंपळगांव ता.गेवराई जि.बीड १०. राजेंद्र मोहन काळे रा.कामती रोड,मोहोळ ता. मोहोळ ११.राणी सखाराम उर्फ सिकंदर वाघमारे रा.नाळवंडी नाका बीड,१२.रतन बळी शेंडगे रा.आश्रमशाळा रोड साठेनगर, इंदापुर, ता.इंदापुर,जि.पुणे,१३.सोन्या उर्फ सोमनाथ उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा. बेलगांव, ता. कर्जत, जि. सोलापूर असे असल्याचे व ते एस टीने नविन एस टी स्टॅण्डवर येवुन एसटी मध्ये चढत व उतरत असताना, धार्मिक कार्यक्रमा दरम्यान होत असलेल्या गर्दीचा फायदा घेवुन महीला व पुरुषांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरत असल्याची व विरळ वस्तीवरील बंद घरातील सोन्याचे दागिने चोरत असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन सदर आरोपींचे गावी बीड, कोरफळे, इंदापुर, सांगोला या ठिकाणी जावुन त्यांचे राहणीमान व त्यांचेवर पाळत ठेवुन सदर आरोपींना इकडील दाखल गुन्ह्याचेकामी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हद्दीत आपण व आपले साथीदारासह एस टी स्टॅण्ड,मंदीर परीसरात तसेच गर्दी होणारे मठ व शिवपुराण कार्यक्रमावेळी व बंद घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले.

या विविध ठिकाणी राहणाऱ्या आरोपींचा नवीन एस टी स्टॅण्ड तसेच पंढरपुर शहर पोलीस ठाणे हद्दीतील गोपनीय बातमीदारांमार्फत सदर संशयितांच्या वास्तव्याची माहिती हस्तगत करून घेवुन गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता आरोपींनी खालील गुन्हे केल्याचे उघडकीस आणले आहेत.

सदरचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३४ तोळे. ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने २४,१४०००/-रू किंमतीचे सोन्याचे दागिणे आरोपीकडून गुन्ह्याचे कामी हस्तगत करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ.अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ,स.पो.फौ.राजेश गोसावी, स.पो.फौ. नागनाथ कदम, पो.ह. बिपीनचंद्र ढेरे,पो.ह.सुरज हेंबाडे,पो.ह.शरद कदम, पो.ह.सिरमा गोडसे,पो.ह.नितीन पलुसकर, पो.ह.सचिन हेंबाडे,पो.ह.नवनाथ माने, पो.शि.शहाजी मंडले,पो.शि. समाधान माने, पो.कॉ.बजरंग बिचुकले,पो.कॉ.निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पो.शि.योगेश नरळे यांनी केली आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading