जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी मुद्देमाल केला जप्त

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगीरी


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/२०२४- पंढरपूर शहरामध्ये शासकीय गोदामामधील कारवाई कामी आणुन लावलेला जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद करून त्यांचेकडुन १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अलीकडे पंढरपुर तहसील कार्यालयाकडील शासकीय गोदाम येथे कारवाई कामी आणुन लावण्यात आलेल्या वाहनांची चोरी होत असल्याबाबत तक्रारींमध्ये वाढ झालेली होती. तसा प्रकार पुन्हा पंढरपुर शहर पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात सदर बाबत गुन्हा दाखल झाला होता. शासकीय कारवाई कामी तहसील ऑफीसच्या शासकीय गोदामामध्ये लावण्यात आलेला जेसीबी हा त्याचे मालकाने न घेवुन जाता अन्य कोणी तरी चोरून नेल्याबाबतचा गुन्हा पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दाखल झालेला होता. सदरचा गुन्हा हा शासकीय गोडावुन येथे घडल्याने व आरोपीने केलेल्या धाडसामुळे तो आव्हानात्मक असल्याने तो उघडकीस आणणे हे कठीण होत होते.

सदरचा जेसीबी चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेचे उद्देशाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे ,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर,डॉ अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग पंढरपुर यांच्या सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील शासकीय गोदाम परिसर या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवुन गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने पंढरपुर शहरात शासकीय कार्यालयांचे ठिकाणी फिरणारे अज्ञात इसमांबाबत ते कोणत्या ठिकाणाहून किंवा परराज्यातुन येतात काय याबाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत का ? याबाबत माहिती काढली असताना गोपनिय बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की,शासकीय गोदामातील जेसीबी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन सदर आरोपी माउली दशरथ लोंढे रा.व्यासनारायण झोपडपट्टी पंढरपुर ता.पंढरपुर यास तो राहत असलेल्या घरावर व त्याच्या नेहमीचे ये-जा करण्याचे ठिकाणावर पाळत ठेवुन सदर आरोपींला दाखल गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले असता व पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला जेसीबी चोरी केल्याचे सांगितले.सदर गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण सखोल तपास करून गुन्हा केल्याचे सांगुन सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरचा शासकीय गोदाम येथुन कारवाई करिता आणुन लावलेला जेसीबी १० लाख रू किंमतीचा जेसीबी चोरून नेला होता ते ही आरोपी कडून हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ.अर्जुन भोसले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सपोफौ राजेश गोसावी,स.पो.फौ.नागनाथ कदम, पो.ह. बिपीनचंद्र ढेरे, पो.ह. सुरज हेंबाडे,पो.ह.शरद कदम, पो.ह.सिरमा गोडसे,पो.ह.नितीन पलुसकर, पो.ह.सचिन हेंबाडे,पो.ह.नवनाथ माने,पो.शि.शहाजी मंडले,पो.शि.समाधान माने,पो.कॉ. बजरंग बिचुकले,पो.कॉ.निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पो.शि. योगेश नरळे यांनी केली आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading