लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले

मागणी केलेल्या लाच रक्कमे पैकी ५,०००/- रुपये स्विकारताना यशस्वी सापळा कारवाई

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २८/०६/२०२४ – तक्रारदार आलोसे विवेक ढेरे यांचे टाटा मेगा वाहन सन २०२० मध्ये वाळू वाहतुक करताना तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडून पकडण्यात आले असून सदरचे वाहन जप्त करुन तहसिलदार सांगोला यांनी तक्रारदार यांचे वाहनावर १,३७,६८४/- रुपये शासकीय दंड आकारला होता. सदरचा दंड तक्रारदार यांनी शासकीय चलनाव्दारे भरुन त्याची पावती तहसिल कार्यालय सांगोला येथे जमा केली.

वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडण्याकरीता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार आलोसे विवेक ढेरे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे वाहन सोडणेबाबतचा अर्ज सादर केला असून सदर अर्जावरुन तक्रादार यांचे वाहन सोडण्याची परवानगी देणेकरीता उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथील प्रकाश विश्वनाथ सगर, वय ५५ वर्षे, पद नायब तहसिलदार, (वर्ग- २) नेमणूक – उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा सध्या रा.नवीन आर.टी. ओ ऑफिस, समृध्दीनगर घर नं.२९,सोलापूर जि.सोलापूर मुळ रा. भुसणे, ता. उमरगा, जि.धाराशिव आणि विवेक विठ्ठल ढेरे, वय ३२ वर्षे, पद महसुल सहाय्यक, (वर्ग- ३) मुळ नेमणूक तहसिल कार्यालय मंगळवेढा, प्रतिनियुक्तीने उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा सध्या रा.नितीन किल्लेदार यांचे घरी भाड्याने,किल्ला बाग,मंगळवेढा जि. सोलापूर मुळ रा. २३/१७७. सावली हौसिंग सोसायटी, गंगानगर इचलकरंजी ता. हातकणंगले यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतः करीता तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचेकरीता म्हणून २०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंति १०,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवून त्यापैकी ५,०००/- रुपये लाच रक्कम विवेक ढेरे यांनी स्वतः स्विकारल्यावरुन त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे रंगेहात पकडण्यात येवून त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस अधिक्षक अमोल तांबे ला.प्र.वि., पुणे, परिवेक्षण अधिकारी अपर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे/खराडे ला.प्र.वि., पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार सोलापूर,पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक एसीबी सोलापूर,पोलीस अंमलदार पोहेकों अतुल घाडगे,पोहेकों सलिम मुल्ला, पोना स्वामीराव जाधव, चापोह राहुल गायकवाड सर्व नेमणूक ला.प्र.वि., सोलापूर यांच्या सापळा पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading