General news

निमा च्या निवडणुकीत श्री धन्वंतरी निमा पॅनलचे वर्चस्व

निमा च्या निवडणुकीत श्री धन्वंतरी निमा पॅनलचे वर्चस्व

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21/01/2024 – निमाच्या NIMA Pandharpur branch च्या झालेल्या पोटनिवडणुकीमधे श्री धन्वंतरी निमा पॅनलचे 18 उमेदवार तर विरोधी निमा परिवर्तन पॅनेलचे 2 उमेदवार निवडून आले.

२१ जाने २०२४ रोजी पंढरपूर येथे निमा पंढरपूर शाखेचे निवडणूक शांततेत पार पडली.एकूण १५२ पैकी १२० सदस्यांनी मतदान केले.यापैकी ३ मतं बाद झाली.

निमा पंढरपूर शाखेचे पुढील उमेदवार विजयी झाले – डॉ.चंद्रकांत लवटे, डॉ.अमरसिंह जमदाडे ,डॉ.किशोरकुमार बागडे,डॉ.प्रविणा लवटे,डॉ.पल्लवी माने ,डॉ.प्रतापसिंह माने, डॉ.आकाश रेपाळ,डॉ.दत्तात्रय व्हनमाने, डॉ.पराग कुलकर्णी,डॉ.स्वप्निल बाड , डॉ.मंजुषा शिंदे,डॉ.किशोर मोरे,डॉ.अमोल बनसोडे,डॉ.प्रीती देशपांडे,डॉ.संगीता कानडे डॉ.पंडित माळी,डॉ.अमोल सातपुते,डॉ. करीमुल्ला मोगल हे श्री धन्वंतरी निमा पॅनेलचे तर निमा परिवर्तन पॅनेलचे डॉ.अर्चना साळुंखे,डॉ.मनोज भायगुडे .

निवडणूक आयोगाचे डॉ.साहेबराव गायकवाड, डॉ.रविराज गायकवाड, डॉ अमोल माळगे, डॉ निशिगंध जाधव, डॉ गणेश जाधव, डॉ.अमीर कोटनाळ यांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *